जेव्हा सह्याद्रि वेड लावतो
कलावंतीण दुर्ग
दिवस १
दोन ते तीन दिवसाची उत्कंठा बाळगून अखेरीस ट्रेक चा दिवस आला. आमच्या प्रवासाची सुरुवात उरणहून झाली सुमारे ६ च्या दरम्यान . मी पहिल्यापासूनच अतिशय उत्सुक होतो कारण मला एका नवीन जागी जायची संधी आली होती . त्या उत्सुकतेने मी निघण्याच्या तासभर आधीच तयार होतो . आम्ही किल्ले प्रबळगड ला जाणार होतो . किल्ले प्रबळगड ची एक गोष्ट म्हणजे मुळात ते दोन डोंगर आहेत . एक आहे प्रबळगड माची आणि दुसरे कलावंतीण दुर्ग . हा किल्ला आसपासच्या मोर्क्यांच्या हालचाली कडे लक्ष देण्या करता बांधला गेला होता . प्रथम आम्ही कलावंतीण दुर्ग ला जाणार होतो आणि मग वेळ मिळाल्यास प्रबळगड माची ला . सर्वप्रथम आम्ही उरणहून बस जिला आपण सर्व प्रेमाने लाल परी म्हणतो त्यात निघालो . बस नि आम्हाला पनवेल बस स्थानकात सोडले . तिकडून आमची बाकी काही मंडळी जमा झाली आणि मग तिकडून आम्ही ठाकूर वाडी कडे निघालो . पनवेल हुन अवघ्या २० मिन वॉर आहे ठाकूर वाडी . या गावाची खासियत म्हणजे हे गाव प्रबळगडाच्या पथ्याशी आहे . तिकडून आम्ही ८ च्या दरम्यान चढाई करायला सुरुवात केली . मी ऐकल्या नुसार टोकापर्यंत पोहोचायला २ ते ३ तास लागतात असे समजले . रमतगमत आम्ही अर्ध्यापर्यंत आलो . काही थकले थोडी विश्रांती घेतली . पुन्हा पुढे चालू लागलो . आणि काहीवेळातच बेस कॅम्प १ ला पोहोचलो . आम्ही या चढाईला कमी आखू नये म्हणून चतुराई ने आम्हाला असे सांगण्यात आले होते . पोहोचल्या वर जेवण झालं आणि आम्ही टेन्ट लावून वस्ती केली . इतकी सुंदर झोप मला माझ्या उभ्या आयुष्यात कधी आली नव्हती . अंगाखाली थंड गार पठार आणि पांघरायला चांदण्यांचं आभाळ . एक अविस्मरणीय अनुभूती होती .

दिवस २
त्या आकाशाकडे बघता बघता कधी झोप लागली कळलेच नाही. रात्र निघून गेली पहाट उजाडू लागली . सूर्योदय आम्हाला कलावंतीण च्या टोकावरून पाहायचा होता म्हणून आम्ही पहाटेच बेस कॅम्प हुन निघालो सुमारे ५ वाजता. ते म्हणतात ना पिच्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त ... तसच काहीसं आमच्यासोबत झालं . निघाल्या पासून १० ते १५ मिन नी एक उंच सुळका दिसू लागला ७०० फीट उंच तो सुळका आमचे मन धास्तावत होता . एक बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूस कातळ . हिम्मत करून चढलो आणि मग जे दृश्य होतं ते अविस्मरणीय होतं . प्रथमच वॉर नजर पडली कि दिसतो तो स्वराज्याचा भगवा अगदी डौलात अन शानदार पणे फडकताना . खूप ठिकाणी थांबून आम्ही फोटो काढत होतो एक आठवण म्हणून . आणि पोचल्या पोहोचल्या सूर्याची पहिली किरणं भगव्यावर पडून आमच्या वर येत होती . असा होता हा मी पाहिलेला सह्याद्री ......
0 comments:
Post a Comment