जेव्हा सह्याद्रि वेड लावतो

Monday, 12 February 2018

Sahyadri through my eyes- Prabalgad

46800 पावलांचा प्रवास .....
किल्ले प्रबळगड
कलावंतीण दुर्गचा ट्रेक झाल्यापासून एक वेगळीच ऊर्जा एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे . कलावंतीण दुर्ग कारण्यावेळेस त्यालगतच एक किल्ला खुणावत होता . मी सहजच विषय काढला कि प्रबळगड कधी करायचा तर अनपेक्षित प्रतिसाद मला मिळाला . सगळे जण तयार झाले आणि अवघ्या १५ दिवसानी आम्ही हा बेत ठरवला.
इतिहास:
प्रबळगड हा पनवेल आणि माथेरानच्या मध्यभागी आहे . पूर्वी हा किल्ला मुरंजन या नावाने प्रसिद्ध होता . प्रबळगड हा किल्ला पनवेलचा किल्ला आणि कल्याण किल्ला या वर टेहळणी करण्यास बांधला गेला होता .
या किल्ल्यावर एक पुरातनकालच गणेश मंदिर आहे .
किल्ल्यावर जायला प्रबळमाची या गावातून रास्ता आहे.
\
पनवेलहुन पायथ्याशी जायला बस असते . हि बस ठाकूरवाडी गावात नेऊन सोडेल.  तिथून आम्ही सुमारे ८:३० रात्रौ ला वर चढण्यास सुरुवात केली . वस्ती करण्याच्या जागे पासून आम्ही १ ते १:३० तासात पोहचू असे एका सहकार्याने सांगितले . ठरल्या वेळे प्रमाणे आम्ही १ तासात किल्ल्याच्या पायथ्याशी वस्ती करायचे ठरवले .
मग तिकडेच जेवण वगैरे केले आणि टेन्ट लावून झोपून गेलो . सप्तरींशी नक्षत्रा खाली अगदी  शांत व सावध झोप लागली .

दिवस २ 
सूर्योदय किल्ल्यावर पाहायचा हे उद्धिष्ट ठेवून आम्ही पहाटे ५:३० लाच निघालो . किल्ल्याकडे जायचा रस्ता एकेरी आणि थोडा भीतीदायक होता. काही वेळाने एक तीव्र चढ आमची जणू परीक्षा पाहण्यास उभा होता . ठरल्या प्रमाणे आम्ही चालत राहिलो आणि बघता बघता सूर्याची किरणे दिसू लागली. हे सुंदर क्षण टिपण्या सारखे होते . हा किल्ला एकूण लांबी ७ किमी असून फिरण्यास वेळ लागणार होता . 
सर्वप्रथम आम्ही किल्ल्याच्या दक्षिण  दिशेस जायचे ठरवले . किल्ल्याच्या दक्षिण दिशेला जाताना एक गणपती मंदिर लागत . हे मंदिर अगदी पुरातन काळची आठवण करून देतं . या मंदिरात खूप जुने अवशेष पाहायला मिळतील .  

किल्ल्याच्या उत्तरबाजूस लागतो तो काळा बुरुज . या बुरुजावरून इरशाळगड , माथेरानचा डोंगर , पेब किल्लाआणि मोरबे धारण (सध्याचे ) अगदी स्पष्ट दिसते 

किल्ल्याच्या उत्तर बाजूस जाण्या साठी घनदाट जंगलातून जावं लागत . ५ - ६ किमी चे हे अंतर १ तासात पूर्ण होतं इतकं हे जंगल घनदाट आहे . उत्तर बाजूला दिसतो तो कलावंतीण चा डोंगर मलंग गड , चंदेरीचा किल्ला . 
असा आहे हा किल्ला प्रबळगड . 


Share:
Location: Machi Prabal, Post: Chikhale, District: Raigad, Panvel, Maharashtra 410206, India

0 comments:

Post a Comment