आयुष्यातला सुवर्णकाळ म्हणजे लहानपण!!
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक असा काळ असतो जो आपण आपल्या मर्जीने व बिनधास्त जगतो . सांगायची गरज नाही तो काळ कोणता ते.... आई बाबा मित्र परिवार बास इतकच आपला जग असायचं. शाळेत असताना खूपदा खाल्लेला मार अजूनही आठवतो. काल दिलेला गृहपाठ तासाच्या आधी केलेला आठवतो. आणि तो वेळेत पूर्ण झाला नाही तर हातापायावर खाल्लेल्या छड्याहि आठवतात. आईला १० वेळा घरी ये ... घरी ये ... असा आवाज द्यायला लावणारे आपण आज जास्त बाहेरच पडत नाही. लहानपणीचे खेळ म्हणजे तर आपला जीव कि प्राणच. कबड्डी काय , खो खो काय , लगोरी काय, आणि ते खेळत असताना धडपडलेलं हि आठवतं. मला माहित्ये मी अगदी प्रौढ व्यक्ती सारखा वाटत असलो तरी लहानपणीची आठवण हि येतेच. आजही मुली खेळात असलेली भातुकली विस्कटून पाळणारे आम्ही आठवतो. आठवलं कि हसू अगदी अनावर होतं. वर्गातल्या त्या बाकाच्या खालच्या कप्प्यात डबा लपवून मधल्या सुट्टीच्या आधी खाल्लेला हि आठवतो. खरंच दिवस फार पटापट उलटून जातात कळतही नाही. शेवटी एकाच म्हणता येईल गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....

0 comments:
Post a Comment