आपण लहानपणा पासून शाळेतील प्रतिज्ञा म्हणत आहोत . सगळ्यांना पाठ असेलच पण त्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न लहान असताना केला नाही म्हणूनच आज तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जात आहे. कोणी कधी विचार केलाय कि शाळेत आपले गणवेश सारखे का असायचे ... कारण लहान असल्यापासून जर आपण जातीभेद मनात आलो तर ते आपल्या देशाच्या उन्नतीसाठी धोकादायक ठरेल. आजकाल ची परिस्थिती पाहता भारतीय असल्याची व्याख्या काय असू शकेल??
शिकवलं तर खूप आपल्याला कि जो या प्रांतात जन्माला आला तो भारतीय पण मुळातच आपली व्याख्या चुकत आलेली आहे .
भारत माता कि जय म्हंटलं कि ज्याच्या ओठी 'जय ' येईल तो भारतीय ..
ज्याच्या मनात धर्मा पेक्षा जास्त प्रेम तिथे राहत असलेल्या माणसांवर आहे तो भारतीय ...
ज्याला आपल्या सैनिक व त्याच्या कुटुंबाविषयी आपुलकी असेल तो भारतीय ...
आणि सैनिकांचं कुटुंब म्हणजे कोण हो??? ते तर संपूर्ण देशाला आपलं कुटुंब मानतात .
एकीकडे ते अहोरात्र सीमेची सुरक्षा करत आहेत आणि आपण त्यांच्या सौरक्षणात राहून त्यांच्या आत्मीयते वर गदा आणत आहोत. एका शक्तिशाली देश घडण्याच्या वाटचालीत आहोत आपण तरी सुद्धा आपण क्षुल्लक कारणानं वरून वाद घालत आहोत. असा घडवणार आहोत आपण आपला देश ??? खरे देशप्रेम तर आपण आपल्या राजाच्या शिकवणीतून ऐकत आलो आहोत. पण आपण ऐकलं किती आपल्याला समजला किती आणि आपण ते अंगिकारला किती या वर एकदा विचार जरूर करा. असच आज मनात आलं म्हणून संवाद साधायचा एक छोटासा प्रयत्न केला . आणि हो अगदीच काही आपल्याला सीमेवर जाऊन देश सुरक्षा करण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या लहान सहान कृतीतूनच आपण हातभार नक्कीच लावू शकतो. आणि आज परिस्थिती पाहता आपल्या सैनिकांशिवाय आपण दुसऱ्या कोणत्याही माणसावर इतका आंधळा विश्वास ठेवू शकत नाहीयोत.
चला आपण मराठा ब्राह्मण राजपूत मुस्लिम क्रिस्टिअन होण्या आधी एक भारतीय होऊयात .
चला हा देश पुन्हा एक करूयात.
जय हिंद!!
0 comments:
Post a Comment