जेव्हा सह्याद्रि वेड लावतो

Tuesday, 7 August 2018

पन्हाळा ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम २०१८

पन्हाळा ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम २०१८
हा ब्लॉग मी ह्यासाठी लिहितोय  जेणेकरून पन्हाळा ते विशाळगड ह्या ऐतिहासिक वाटेची एक काल्पनिक सैर होईल .


लहानपणा पासूनच महाराजांचा इतिहास वाचत असल्याने अशे काही मला आवडलेले क्षण आहेत कि जे मला आयुष्यात एकदातरी करायला आवडतील. त्या पैकीच हा एक प्रसंग . हा योग मला बा रायगड परिवार ने अनुभवायला दिला त्या साठी त्यांचे मनःपूर्व आभार.
महिना भरापासूनच उत्सुकता होती . आणि हा प्रवास सुरु झाला.
प्रथम आम्ही मुंबई कोल्हापूर हा प्रवास बस ने केला. पूर्ण महाराष्ट्रातून एकूण २५० मावळे या मोहिमेत सहभागी होते. मुंबईहून आम्ही एकूण ७० जण प्रवास सुरु केला. अनेक अनोळखी चेहरे ओळखीचे होत जात होते. मोहीम पन्हाळ्या पासून सुरवात होणार होती . पन्हाळ्याला पोहोचल्यावर सुमारे ८ वाजता आमची पदभ्रमंती सुरु झाली. ५ गट करण्यात आल्याने प्रत्येक गटाचे गटनायक ठरवण्यात आले होते . हा प्रवास एकूण ६८किमी चा असल्याने आम्हाला सायंकाळ प्रयन्त मुक्कामाच्या ठिकाणी गरजेचे होते. मुक्काम हा पांढरपाणी येथे होता जे ४८ किमी लांब होते. शिवगर्जना प्रतिज्ञा आणि मोहक अश्या वातावरणात प्रवास सुरु झाला .
प्रवासादरम्यान अनेक वेळा पाऊस नदी  ओढे यांना पार करत आम्ही पुढे जात होतो. प्रथम आम्हाला लागला तो मसाईचे पठार. अतिशय मोठं  असलेल हे पठार आमची परीक्षा पाहत होतं. काही वेळ विश्रांती केल्यावर पुन्हा आम्ही चालू लागलो. तीन ते चार डोंगर ओलांडून आम्ही जंगलाच्या बाजूस आलो. इथे येई पर्यंत आमची इचछा  शक्ती उत्तर देऊ लागली होती . काही मावळे जखमी झाले काहींना झेपलं पण तरीही सगळीजणं पुढे सरकत राहिले. बा रायगड परिवाराच्या सदस्यांना सलाम कि ज्यांनी आम्हाला सतत जग ठेवलं आणि लक्ष विचलित होऊ दिला नाही. 

अनेक अडीअडचणींवर मात करत आम्ही सुमारे ८:३० वाजता पांढरपाणी मुक्कामास पोहोचलो. सगळीजणं खूप थकले  असल्याने  त्वरित जेवायला बसलो.  अतिशय स्वादिष्ट  असे भोजन केले. 
पुढच्या दिवशी आम्हाला पावनखिंड गाठून विशाळगडाकडे प्रस्थान कराचे होते. ठरल्या प्रमाणे सगळे पुन्हा नव्या उत्साहात निघाले. हि वाट १८ किमी ची असल्याने थोडी सुखकर होती. 
पावनखिंड व विशाळगड असे दोन्ही टप्पे करून आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो. 
पावनखिंड या ऐतिहासिक वाटेचे उल्लेख शब्दात होऊ शकत नाही. ते प्रत्यक्ष अनुभवायलाच हवे. त्यावाटेवरून जाताना त्यावेळी चे दृश्य अगदी डोळ्यासमोर आले आणि महाराजांप्रति आदर द्विगुणित झाला. आणि वीर बाजी प्रभू देशपांडे आणि शिवा  काशीद यांच्या बलिदानास शत शत नमन.





Share:

Saturday, 24 February 2018

लहानपण

आयुष्यातला सुवर्णकाळ म्हणजे लहानपण!!
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक असा काळ  असतो जो आपण  आपल्या मर्जीने व बिनधास्त जगतो . सांगायची गरज नाही तो काळ कोणता ते.... आई बाबा मित्र परिवार बास इतकच आपला जग असायचं. शाळेत असताना खूपदा खाल्लेला मार अजूनही आठवतो. काल दिलेला गृहपाठ तासाच्या आधी केलेला आठवतो. आणि तो वेळेत पूर्ण झाला नाही तर हातापायावर खाल्लेल्या छड्याहि आठवतात. आईला  १० वेळा घरी ये ... घरी ये ... असा आवाज द्यायला लावणारे आपण आज जास्त बाहेरच पडत नाही. लहानपणीचे खेळ म्हणजे तर आपला जीव कि प्राणच. कबड्डी काय , खो खो  काय , लगोरी काय, आणि ते खेळत असताना धडपडलेलं हि आठवतं. मला माहित्ये मी अगदी प्रौढ व्यक्ती सारखा वाटत असलो तरी लहानपणीची आठवण हि येतेच. आजही मुली खेळात असलेली भातुकली विस्कटून पाळणारे आम्ही आठवतो. आठवलं कि हसू अगदी अनावर होतं. वर्गातल्या त्या बाकाच्या  खालच्या कप्प्यात डबा लपवून मधल्या सुट्टीच्या आधी खाल्लेला हि आठवतो. खरंच दिवस फार पटापट उलटून जातात कळतही नाही. शेवटी एकाच म्हणता येईल गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....  
Share:

Saturday, 17 February 2018

भारतीय

आपण लहानपणा पासून शाळेतील प्रतिज्ञा म्हणत आहोत . सगळ्यांना पाठ असेलच पण त्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न लहान असताना केला नाही म्हणूनच आज तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जात आहे. कोणी कधी विचार केलाय कि शाळेत आपले गणवेश सारखे का असायचे ... कारण लहान असल्यापासून जर आपण जातीभेद मनात आलो तर ते आपल्या देशाच्या उन्नतीसाठी धोकादायक ठरेल. आजकाल ची परिस्थिती पाहता भारतीय असल्याची व्याख्या काय असू शकेल?? 
शिकवलं तर खूप आपल्याला कि जो या प्रांतात जन्माला आला तो भारतीय पण मुळातच आपली व्याख्या चुकत आलेली आहे . 
भारत माता कि जय म्हंटलं कि ज्याच्या ओठी 'जय ' येईल तो भारतीय .. 
ज्याच्या मनात धर्मा पेक्षा जास्त प्रेम  तिथे राहत असलेल्या माणसांवर आहे तो भारतीय ... 
ज्याला आपल्या सैनिक व त्याच्या कुटुंबाविषयी आपुलकी असेल तो  भारतीय ... 
आणि सैनिकांचं कुटुंब म्हणजे कोण हो???  ते तर संपूर्ण देशाला आपलं कुटुंब मानतात . 
एकीकडे ते अहोरात्र सीमेची सुरक्षा करत आहेत आणि आपण त्यांच्या सौरक्षणात राहून त्यांच्या आत्मीयते वर  गदा आणत आहोत. एका शक्तिशाली देश घडण्याच्या वाटचालीत आहोत आपण तरी सुद्धा आपण क्षुल्लक कारणानं वरून वाद घालत आहोत. असा घडवणार आहोत आपण आपला देश ??? खरे देशप्रेम तर आपण आपल्या राजाच्या शिकवणीतून ऐकत  आलो आहोत. पण आपण ऐकलं किती आपल्याला समजला किती आणि आपण ते अंगिकारला किती या वर एकदा विचार जरूर करा. असच आज मनात आलं म्हणून संवाद साधायचा एक छोटासा प्रयत्न केला . आणि हो अगदीच काही आपल्याला सीमेवर जाऊन देश सुरक्षा करण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या लहान सहान कृतीतूनच आपण हातभार नक्कीच लावू शकतो. आणि आज परिस्थिती पाहता आपल्या सैनिकांशिवाय आपण दुसऱ्या कोणत्याही माणसावर इतका आंधळा विश्वास ठेवू शकत नाहीयोत. 
चला आपण मराठा ब्राह्मण राजपूत मुस्लिम  क्रिस्टिअन होण्या आधी एक भारतीय होऊयात . 
चला हा देश पुन्हा एक करूयात. 
जय हिंद!!

Share:

Monday, 12 February 2018

Durg Sanvardhan - Kille Prabalgad

महाराष्ट्र म्हणजे नैसर्गिक विविधतेने नटलेला प्रदेश. महाराष्ट्राची खरी ओळख असणारा राखट सह्याद्री!! आकाशात झेपावणारे उत्तुंग कडे आणि किर्र जगलांने व्यापलेला खोलचखोल दरय़ा. ह्याच वनांचा आधार घेत कित्येक हजारवर्षे प्राणीमात्रांचा अधिवास बनला आहे. ह्याच कड्यांचा दरय़ातुन उगम पावणारय़ा कॄष्णा, गोदावरी अश्या पवित्र नद्द्यांचा पाण्यावरच महाराष्ट्रधर्म वाढीला लागला. चालुक्य, सातवाहन, शिलाहार, यादव अशा अनेक राजवटींनी महाराष्ट्राची किर्ती सातासमुद्रापार नेली. महाराष्ट्राची संस्कॄती जतन आणि संरक्षणा करण्यासाठी त्या त्या काळातील राजवटींनी ह्या सह्याद्रीच्या माथ्य़ावर किल्ले उभारणी केली. आपापल्या गरजेनुसार गिरिदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्ग अश्या किल्लांची उभारणी झाली. यादुर्गरत्नांनीच महाराष्ट्राच्या प्रदेशाची वर्षानुवर्षे रक्षण केले. नुसत्या स्थानिक राज्यकर्त्यानी नव्हेतर परदेशी आक्रमकांनी सुध्दा ह्या प्रदेशात किल्ले उभारले. किल्ल्यांचे जे प्रमुख चार पडतात त्यातील सर्व प्रकारातील किल्ल्याचे प्रकार महाराष्ट्रात आढळतात.
या ट्रेक आधी मी अगदीच अनोळखी होतो या विषयाशी पण हा विषय अतिशय नाजूक व महत्वाचा आहे . आपल्या राजानं हा अनमोल ठेवा आपल्या हाती सोपवला आहे तो आपण सांभाळण्यास पूर्णपणे असमर्थ आहोत हे आज आपल्या गाद किल्ल्यांची अवस्था पाहून कळले . परदेशातील लोक त्यांच्या राजा अथवा कोणीही महत्वाच्या व्यक्तीची आठवण म्हणून त्यांची एक एक वस्तू ती मालमत्ता असुद्या किंवा त्यांची इतर काही सामान असुद्या फार काळजी पूर्वक जपून ठेवतात आणि आपण आपल्या आहेत त्या गाद किल्ल्यांची साधी देखभाल हि करू शकत नाही आहोत हि अतिशय शरमेची बाब आहे .  
दुर्ग संवर्धन अंतर्गत अनेक विषय येतात 
१. ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन 
२. कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलन 
३. सुरक्षित मार्ग करणे 
४. पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवणे 
५. वृक्षसंपदेचे संवर्धन 
६. माहिती फलक 
आताच भेट दिलेल्या प्रबळगड या किल्ल्याची एक बाजू  काळा बुरुज या असा पासचा परिसर स्वच्छ करून दुर्ग संवर्धन च्या  वाटचालीत थोडासा हातभार . 
दुर्ग किल्ल्यांचे वारकरी : प्रबळगड ट्रेक 
Share:

Sahyadri through my eyes- Prabalgad

46800 पावलांचा प्रवास .....
किल्ले प्रबळगड
कलावंतीण दुर्गचा ट्रेक झाल्यापासून एक वेगळीच ऊर्जा एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे . कलावंतीण दुर्ग कारण्यावेळेस त्यालगतच एक किल्ला खुणावत होता . मी सहजच विषय काढला कि प्रबळगड कधी करायचा तर अनपेक्षित प्रतिसाद मला मिळाला . सगळे जण तयार झाले आणि अवघ्या १५ दिवसानी आम्ही हा बेत ठरवला.
इतिहास:
प्रबळगड हा पनवेल आणि माथेरानच्या मध्यभागी आहे . पूर्वी हा किल्ला मुरंजन या नावाने प्रसिद्ध होता . प्रबळगड हा किल्ला पनवेलचा किल्ला आणि कल्याण किल्ला या वर टेहळणी करण्यास बांधला गेला होता .
या किल्ल्यावर एक पुरातनकालच गणेश मंदिर आहे .
किल्ल्यावर जायला प्रबळमाची या गावातून रास्ता आहे.
\
पनवेलहुन पायथ्याशी जायला बस असते . हि बस ठाकूरवाडी गावात नेऊन सोडेल.  तिथून आम्ही सुमारे ८:३० रात्रौ ला वर चढण्यास सुरुवात केली . वस्ती करण्याच्या जागे पासून आम्ही १ ते १:३० तासात पोहचू असे एका सहकार्याने सांगितले . ठरल्या वेळे प्रमाणे आम्ही १ तासात किल्ल्याच्या पायथ्याशी वस्ती करायचे ठरवले .
मग तिकडेच जेवण वगैरे केले आणि टेन्ट लावून झोपून गेलो . सप्तरींशी नक्षत्रा खाली अगदी  शांत व सावध झोप लागली .

दिवस २ 
सूर्योदय किल्ल्यावर पाहायचा हे उद्धिष्ट ठेवून आम्ही पहाटे ५:३० लाच निघालो . किल्ल्याकडे जायचा रस्ता एकेरी आणि थोडा भीतीदायक होता. काही वेळाने एक तीव्र चढ आमची जणू परीक्षा पाहण्यास उभा होता . ठरल्या प्रमाणे आम्ही चालत राहिलो आणि बघता बघता सूर्याची किरणे दिसू लागली. हे सुंदर क्षण टिपण्या सारखे होते . हा किल्ला एकूण लांबी ७ किमी असून फिरण्यास वेळ लागणार होता . 
सर्वप्रथम आम्ही किल्ल्याच्या दक्षिण  दिशेस जायचे ठरवले . किल्ल्याच्या दक्षिण दिशेला जाताना एक गणपती मंदिर लागत . हे मंदिर अगदी पुरातन काळची आठवण करून देतं . या मंदिरात खूप जुने अवशेष पाहायला मिळतील .  

किल्ल्याच्या उत्तरबाजूस लागतो तो काळा बुरुज . या बुरुजावरून इरशाळगड , माथेरानचा डोंगर , पेब किल्लाआणि मोरबे धारण (सध्याचे ) अगदी स्पष्ट दिसते 

किल्ल्याच्या उत्तर बाजूस जाण्या साठी घनदाट जंगलातून जावं लागत . ५ - ६ किमी चे हे अंतर १ तासात पूर्ण होतं इतकं हे जंगल घनदाट आहे . उत्तर बाजूला दिसतो तो कलावंतीण चा डोंगर मलंग गड , चंदेरीचा किल्ला . 
असा आहे हा किल्ला प्रबळगड . 


Share:

Thursday, 1 February 2018

Sahyadri through my eyes

जेव्हा सह्याद्रि वेड लावतो
कलावंतीण दुर्ग
दिवस १
दोन ते तीन दिवसाची उत्कंठा बाळगून अखेरीस ट्रेक चा दिवस आला. आमच्या प्रवासाची सुरुवात उरणहून झाली सुमारे ६ च्या दरम्यान . मी पहिल्यापासूनच अतिशय उत्सुक होतो कारण मला एका नवीन जागी जायची संधी आली होती . त्या उत्सुकतेने मी निघण्याच्या तासभर आधीच तयार होतो . आम्ही किल्ले प्रबळगड ला जाणार होतो . किल्ले प्रबळगड ची एक गोष्ट म्हणजे मुळात ते दोन डोंगर आहेत . एक आहे प्रबळगड माची आणि दुसरे कलावंतीण दुर्ग . हा किल्ला आसपासच्या मोर्क्यांच्या हालचाली कडे लक्ष देण्या करता बांधला गेला होता . प्रथम आम्ही कलावंतीण दुर्ग ला जाणार होतो आणि मग वेळ मिळाल्यास प्रबळगड माची ला . सर्वप्रथम आम्ही उरणहून बस जिला आपण सर्व प्रेमाने लाल परी म्हणतो त्यात निघालो . बस नि आम्हाला पनवेल बस स्थानकात सोडले . तिकडून आमची बाकी काही मंडळी जमा झाली आणि मग तिकडून आम्ही ठाकूर वाडी कडे निघालो . पनवेल हुन अवघ्या २० मिन वॉर आहे ठाकूर वाडी . या गावाची खासियत म्हणजे हे गाव प्रबळगडाच्या पथ्याशी आहे . तिकडून आम्ही ८ च्या दरम्यान चढाई करायला सुरुवात केली . मी ऐकल्या नुसार टोकापर्यंत पोहोचायला २ ते ३ तास लागतात असे समजले . रमतगमत आम्ही अर्ध्यापर्यंत आलो . काही थकले थोडी विश्रांती घेतली . पुन्हा पुढे चालू लागलो . आणि काहीवेळातच बेस कॅम्प १ ला पोहोचलो . आम्ही या चढाईला कमी आखू नये म्हणून चतुराई ने आम्हाला असे सांगण्यात आले होते . पोहोचल्या वर जेवण झालं आणि आम्ही टेन्ट लावून वस्ती केली . इतकी सुंदर झोप मला माझ्या उभ्या आयुष्यात कधी आली  नव्हती . अंगाखाली थंड गार पठार आणि पांघरायला चांदण्यांचं आभाळ . एक अविस्मरणीय अनुभूती होती .
दिवस २
त्या आकाशाकडे बघता बघता कधी झोप लागली कळलेच नाही. रात्र निघून गेली पहाट उजाडू लागली . सूर्योदय आम्हाला कलावंतीण च्या टोकावरून पाहायचा होता म्हणून आम्ही पहाटेच बेस कॅम्प हुन निघालो सुमारे ५ वाजता. ते म्हणतात ना पिच्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त ... तसच काहीसं आमच्यासोबत झालं . निघाल्या पासून १० ते १५ मिन नी एक उंच सुळका दिसू लागला ७०० फीट उंच तो सुळका आमचे मन धास्तावत होता . एक बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूस कातळ . हिम्मत करून चढलो आणि मग जे दृश्य होतं ते अविस्मरणीय होतं . प्रथमच वॉर नजर पडली कि दिसतो तो स्वराज्याचा भगवा अगदी डौलात अन शानदार पणे फडकताना . खूप ठिकाणी थांबून आम्ही फोटो काढत होतो एक आठवण म्हणून . आणि पोचल्या पोहोचल्या सूर्याची पहिली किरणं भगव्यावर पडून आमच्या वर  येत होती . असा होता हा मी पाहिलेला सह्याद्री ...... 

Share: