जेव्हा सह्याद्रि वेड लावतो

Tuesday, 7 August 2018

पन्हाळा ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम २०१८

पन्हाळा ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम २०१८
हा ब्लॉग मी ह्यासाठी लिहितोय  जेणेकरून पन्हाळा ते विशाळगड ह्या ऐतिहासिक वाटेची एक काल्पनिक सैर होईल .


लहानपणा पासूनच महाराजांचा इतिहास वाचत असल्याने अशे काही मला आवडलेले क्षण आहेत कि जे मला आयुष्यात एकदातरी करायला आवडतील. त्या पैकीच हा एक प्रसंग . हा योग मला बा रायगड परिवार ने अनुभवायला दिला त्या साठी त्यांचे मनःपूर्व आभार.
महिना भरापासूनच उत्सुकता होती . आणि हा प्रवास सुरु झाला.
प्रथम आम्ही मुंबई कोल्हापूर हा प्रवास बस ने केला. पूर्ण महाराष्ट्रातून एकूण २५० मावळे या मोहिमेत सहभागी होते. मुंबईहून आम्ही एकूण ७० जण प्रवास सुरु केला. अनेक अनोळखी चेहरे ओळखीचे होत जात होते. मोहीम पन्हाळ्या पासून सुरवात होणार होती . पन्हाळ्याला पोहोचल्यावर सुमारे ८ वाजता आमची पदभ्रमंती सुरु झाली. ५ गट करण्यात आल्याने प्रत्येक गटाचे गटनायक ठरवण्यात आले होते . हा प्रवास एकूण ६८किमी चा असल्याने आम्हाला सायंकाळ प्रयन्त मुक्कामाच्या ठिकाणी गरजेचे होते. मुक्काम हा पांढरपाणी येथे होता जे ४८ किमी लांब होते. शिवगर्जना प्रतिज्ञा आणि मोहक अश्या वातावरणात प्रवास सुरु झाला .
प्रवासादरम्यान अनेक वेळा पाऊस नदी  ओढे यांना पार करत आम्ही पुढे जात होतो. प्रथम आम्हाला लागला तो मसाईचे पठार. अतिशय मोठं  असलेल हे पठार आमची परीक्षा पाहत होतं. काही वेळ विश्रांती केल्यावर पुन्हा आम्ही चालू लागलो. तीन ते चार डोंगर ओलांडून आम्ही जंगलाच्या बाजूस आलो. इथे येई पर्यंत आमची इचछा  शक्ती उत्तर देऊ लागली होती . काही मावळे जखमी झाले काहींना झेपलं पण तरीही सगळीजणं पुढे सरकत राहिले. बा रायगड परिवाराच्या सदस्यांना सलाम कि ज्यांनी आम्हाला सतत जग ठेवलं आणि लक्ष विचलित होऊ दिला नाही. 

अनेक अडीअडचणींवर मात करत आम्ही सुमारे ८:३० वाजता पांढरपाणी मुक्कामास पोहोचलो. सगळीजणं खूप थकले  असल्याने  त्वरित जेवायला बसलो.  अतिशय स्वादिष्ट  असे भोजन केले. 
पुढच्या दिवशी आम्हाला पावनखिंड गाठून विशाळगडाकडे प्रस्थान कराचे होते. ठरल्या प्रमाणे सगळे पुन्हा नव्या उत्साहात निघाले. हि वाट १८ किमी ची असल्याने थोडी सुखकर होती. 
पावनखिंड व विशाळगड असे दोन्ही टप्पे करून आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो. 
पावनखिंड या ऐतिहासिक वाटेचे उल्लेख शब्दात होऊ शकत नाही. ते प्रत्यक्ष अनुभवायलाच हवे. त्यावाटेवरून जाताना त्यावेळी चे दृश्य अगदी डोळ्यासमोर आले आणि महाराजांप्रति आदर द्विगुणित झाला. आणि वीर बाजी प्रभू देशपांडे आणि शिवा  काशीद यांच्या बलिदानास शत शत नमन.





Share: